आगामी २०२३ मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयावर वाढणार दबाव, ८५ पर्यंत घसरण्याची शक्यता

वर्ष २०२३ मध्ये रुपयाबाबत प्रचंड अस्थिरता राहण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक्स कॅपिटलने वर्तवलेल्या अनुमानानुसार, रुपया वर्ष २०२३ मध्ये डॉलरच्या तुलनेत ८५ पर्यंत घसरू शकतो. यासोबतच रिसर्च हाऊसने सांगितले आहे की, २०२३ च्या अखेरीस रुपया ८० पर्यंत पुन्हा सावरू शकतो. तर २०२४ च्या अखेरच्या महिन्यात तो डॉलरच्या तुलनेत ७८ पर्यंत येवू शकेल.

एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, कॅपिटल इकॉनॉमिक्सचे सीनियर मार्केट इकॉनॉमिस्ट जोनास गोल्टरमॅन यांनी सांगितले की, नोव्हेंबरमधील जोरदार घसरणीनंतर डॉलर गेल्या महिनाभरात स्थिर आहे. अशातच असे वाढते की संथ जागतिक अर्थव्यवस्था आणि मार्केटमधील स्थिती २०२३ च्या पहिल्या सहामाहीत डॉलरच्या तुलनेत आणखी एक लेगअपला प्रोत्साहन देईल. डॉलर इतर देशांच्या चलनांच्या तुलनेत पुढील तिमाहीत आणखी मजबूत होईल. कारण जोखमी घेणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. रुपया या महिन्याच्या अखेरीस ८३ वर व्यापार करणे आणि मार्च २०२३ च्या अखेरीस ८४ पर्यंत घसरण्याचा अंदाज वर्तवला आहे. जूनपर्यंत तो ८५ पर्यंत घसरेल. कॅपिटल इकॉनॉमिक्सच्या म्हणण्यानुसार, २०२३ च्या दुसऱ्या सहामाहीत चलनात काही रिकव्हरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्ष अखेरीस तो ८० वर आणि २०२४ च्या अखेरीस तो ७८ वर येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here