ऊसाला प्रती क्विंटल ६०० रुपये दर देण्याची मागणी

शामली : बाबरीमध्ये भाकियू वर्मा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या एका बैठकीत ऊस दराबाबत चर्चा करण्यात आली. भाकियू वर्मा आणि पश्चिम प्रदेश मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगत सिंह वर्मा यांनी सांगितले की, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांची उपेक्षा करीत आहे.

लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांच्या पिकांसाठी योग्य आणि लाभदायी दर सरकारने दिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना चौदा दिवसात ऊस बिले देण्याची तरतुद आहे. मात्र, चौदा महिन्यानंतरही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. साखर कारखान्यानकडे जवळपास ३०० कोटी रुपयांची ऊस बिले थकीत आहेत. ऊस हंगाम सुरू होवून दोन महिने उलटले तरी अद्याप योगी सरकारने ऊर दर ६०० रुपये प्रती क्विंटल जाहीर केलेला नाही, अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. यावेळी सुदेश पाल सिंह, योगेंद्र सिंह, सरदार ओंकार सिंह, अशोक चौधरी, सचिन चौधरी, मेहबूब हसन, मोहम्मद सुलेमान आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here