चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी २०२३ मध्ये पोंगल उत्सव साजरा करण्यासाठी राज्य भरातील रेशन कार्डधारकांना तांदूळ, साखरेसह रोख १००० रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. वर्ष २०२३ मध्ये तमीळ थाई पोंगल साजरा करण्यासाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य सचिवालयात सल्लागारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, सर्व कार्डधारांना तांदूळ आणि श्रीलंकन तमीळ पुनर्वनस शिबिरात राहणाऱ्या कुटुंबांन एक किलो साखर आणि १००० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे २.१९ कोटी रेशन कार्ड धारकांना लाभ मिळेल. त्यासाठी सरकार २,३५६.६७ कोटी रुपये खर्च होतील. स्टॅलिन २ जानेवारी २०२३ रोजी चेन्नईत आणि त्याच दिवशी इतर जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्हा मंत्र्यांकडून पोंगल पुरस्कार देण्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येईल.