सरकारी योजनेअंतर्गत या कामांसाठी शेतकऱ्यांना मिळणार १८२ कोटी रुपयांचे अनुदान

पिकाच्या उत्पादनानंतर त्याच्या साठवणुकीसाठी शेतकऱ्यांना गोदामांची गरज भासते. अनेकवेळा त्यांच्या पिकाला योग्य दर मिळत नाही. मात्र, शेतकरी स्वतः चांगल्या गोदामाची उभारणी करू शकत नाहीत. शेतकऱ्यांचे पिक सुरक्षित रुपात साठवले जावे यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. या अंतर्गत यावेळी पिक उत्पादन पश्चात व्यवस्थापनासाठी, WareHouse युनिट तयार करण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

आज तकमधील वृत्तानुसार, उत्तर प्रदेशात एकिकृत बागायती मिशन योजनेअंतर्गत १२५ शीतगृह स्थापन करण्यात आले आहेत. याशिवाय लो कॉस्ट प्रिझर्व्हेशन युनिट, पॅकिंग हाऊस, भांडारगृहांसाठी १८२ कोटी रुपयांचे अनुदान दिले जात आहे. आग्रा जिल्ह्यात केंद्रीय बटाटा संशोधन केंद्राची स्थापना केली जाईल आणि ५७२ अन्न प्रक्रिया योजनांना मंजुरी दिली जाणार आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना अथवा शेतकरी उत्पादन समुहांना मोठ्या प्रमाणावर कोल्ड स्टोअरेज हाऊस स्थापन करण्यासाठी मदत देत आहे. तशाच पद्धतीने राज्य सरकारही शेतऱ्यांना मदत देत आहे. बिहार कृषी विभागाच्या बागायती संचालनालयाच्यावतीने शेतकऱ्यांना या स्कीमअंतर्गत मदत केली जात आहे. शेतकरी संघांना ७५ टक्के अनुदानावर १८.७५ लाख रुपये दिले जात आहेत. कोल्ड स्टोअरेज उभारणीचा खर्च २५ लाख रुपये निश्चित करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here