गंधर ऑइल रिफाइनरीने इनिशियल पब्लिक ऑफरसाठी (IPO) भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (सेबी) सुरुवातीचे ड्राफ्ट पेपर्स सादर केले आहेत. डीआरएचपी अनुसार आयपीओअंतर्गत ३५७ कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी केले जातील. आणि प्रवर्तक तथा सध्याच्या शेअरधारकांच्या १.२ कोटी शेअर्सच्या विक्री ओफएफएसअंतर्गत केली जाईल.
बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या माहितीनुसार, ओएफएसअंतर्गत जवळपास ५०० कोटी रुपये उभे केले जाणार आहेत. ओएफएसअंतर्गत प्रवर्तक रमेश बाबूलाल पारेख, कैलाश पारेख आणि गुलाब पारेख तथा इतर शेअरधारक फ्लीट लाइन शिपिंग सर्व्हिसेस एलएलसी, आयडीएफसी फर्स्ट बँक लि., डेन्वर बिल्डिंग मॅट अँड डेकोर टीआर एलएलसी तथा ग्रीन डेजर्स रिअल इस्टेट ब्रोकर्स शेअर्सचे सादरीकरण करतील. नव्याने उभारण्यात आलेला निधी कंपनीचा क्षमता विस्तार आणि उपकरणांच्या खरेदीसाठी खर्च केला जाईल.