उत्तर प्रदेश : मलकपूर साखर कारखान्यात शेतकऱ्यांचा गोंधळ

बडौत : मलकपूर साखर कारखान्यात रात्री शेतकऱ्यांनी थकीत ऊस बिले आणि खराब रस्त्यांच्या प्रश्नावरून जोरदार गोंधळ घातला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी शेतकऱ्यांशी धक्काबुक्की केली. त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. ग्रामस्थांनी गावागावात जाऊन या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर २९ रोजी मलकपूर कारखान्याच्या विरोधात महापंचायत आयोजित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर कारखान्याकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांनी बावलीपासून कारखान्यापर्यंत असलेल्या खराब रस्त्यांबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांशी धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला. बावली गावचे गौरव तोमर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी तेथे पोहोचले आणि पोलिसांवर मनमानीचा आरोप करीत त्यांच्याशी झटापट करू लागले. पोलिसांनी सरपंचांसह शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. शनिवारी सकाळी मोठ्या संख्येने शेतकरी पोलिस ठाण्यावर पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना ताकीद देवून सोडून दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी मलकपूर कारखान्याविरोधात महापंचायत करण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य विनय मास्टर, शक्ती प्रधान रुस्तमपूर, बेगराज, अश्वनी तोमर, बोबी, अरविंद प्रधान, जयपाल चौधरी, प्रमोद, डॉ. बिल्लू आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here