हरियाणात राकेश टिकेत यांची घोषणा, २६ जानेवारी रोजी देशभर शेतकऱ्यांचे आंदोलन

कर्नाल : हरियाणातील कर्नालमध्ये गुरुद्वारा डेरा कार सेवेमध्ये शनिवारी संयुक्त किसान मोर्चाची (एसकेएम) बैठक झाली. यावेळी देशभरातील शेतकरी नेते उपस्थित होते. जवळपास तीन तास चाललेल्या बैठकीत शेतकरी नेत्यांनी २६ जानेवारी रोजी देशभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला. याच दिवशी जींदमध्ये शेतकरी महापंचायतीचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली.

आज तकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, राकेश टिकैत यांनी सांगितले की, २६ जानेवारी रोजी हरियाणातील जींदमध्ये मोठी रॅली काढण्यात आली. या रॅलीत हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमधून शेतकरी सहभागी होतील. इतर राज्यांमध्ये शेतकरी प्रत्येक जिल्ह्यात टॅक्टर मार्च काढतील. ट्रॅक्टर मार्च झाल्यानंतर शेतकरी आपल्या मागण्यांचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करतील. शेतकरी नेत्यांनी सांगितले की, २६ जानेवारी रोजी रॅलीनंतर शेतकरी दिल्लीत बैठक आयोजित करतील. शेतकऱ्यांवर यापूर्वीच्या आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल जे गुन्हे दाखल आहेत, ते मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. हे गुन्हे रद्द करावेत या मागणीसाठी आंदोलन केले जाईल. त्यासाठीची रणनीती आखली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here