ऊस दर वाढीसाठी शेतकऱ्यांनी रोखला दिल्ली-हिस्सार महामार्ग

महम : ऊसाचा दर वाढवण्याच्या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिल्ली – हिस्सार महामार्गावर भैणी महाराजपूर गावात चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनाची माहिती मिळताच महम पोलीस ठाण्याचे प्रभारी रमेश कुमार हे घटनास्थळी पोहोचले. या आंदोलनादरम्यान, त्यांनी प्रवासी आणि वाहनधारकांच्या त्रासाविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली. आंदोलन मागे घेण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर अर्ध्या तासानंतर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. त्यानंतरही शेतकऱ्यांनी संतप्त होत महम साखर कारखान्याच्या गेटसमोर निदर्शने केली. दुपारी दोन वाजेपर्यंत आंदोलन सुरू राहिले.

हरिभूमी डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उसाला ४५० रुपये प्रती क्विंटल दर देण्याची मागणी केली. पंजाबमध्ये हरियाणा पेक्षा अधिक दर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तेथे उसाचा उत्पादन खर्चही कमी आहे. आपल्या राज्यात दर अधिक देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी सहकारी साखर कारखान्याचे एमडी दलबीर सिंह फोगाट यांना निवेदन दिले. अखिल भारतीय किसान सभेचे तालुकाध्यक्ष राय सिंह नहरा आणि शेतकरी युनियनचे जिल्हाध्यक्ष अजमेर सिंह यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. ऊस बिले त्वरीत दिली जावीत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. अडीच महिन्यांपासून बिले दिली जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here