नवी दिल्ली : सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चने (सीईबीआर) सोमवारी सांगितले की, भारताच्या विकासाची गती २०२२ मध्ये अधिक आहे. त्यामुळे भारत वर्ल्ड इकॉनॉमिक लीगच्या तालिकेत पाचव्या स्थापनापासून २०३७ पर्यंत जागतिक रॅंकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. सीईबीआरने आपल्या वार्षिक वर्ल्ड इकॉनॉमिक लीग टेबल २०२३ मध्ये म्हटले आहे की, पुढील पाच वर्षात सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या वाढीचा वार्षिक वेग ६.४ टक्के राहील अशी अपेक्षा आहे. त्यानंतर पुढील नऊ वर्षांमध्ये विकास दर सरासरी ६.५ टक्के राहील अशी शक्यता आहे. सीईबीआरद्वारे सोमवारी जारी करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे की, वर्ल्ड इकॉनॉमिक लिगमध्ये भारत २०२२ च्या पाचव्या स्थानावरून २०३७ पर्यंत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.
सीईबीआरने म्हटले आहे की, भारताचे २०२२ मध्ये अनुमानीत पीपीपी समायोजित सकल देशांतर्गत उत्पन्न ८,२९३ अमेरिकन डॉलर होते. हे उत्पन्न निम्न मध्यम उत्पन्न गटातील देशाच्या रुपात वर्गीकृत केले जाते. पीपीपी जीडीपी सकल देशांतर्गत उत्पादन आहे, त्याची क्रय शक्ती समानतेच्या दरांचा वापर करून आंतरराष्ट्रीय डॉलरमध्ये परावर्तीत करण्यात येते. मात्र, भारतात बहुतांश श्रम बाजारात कृषी रोजगार हा हिस्सा मोठा आहे. सीईबीआरने सांगितले की, देशातील बहुतांश आर्थिक घडामोडींचा लेखा-जोखा देशातील सेवा क्षेत्राद्वारे केला जातो. कारण, त्याची अर्थव्यवस्था विविध स्तरावर विकसित झाली आहे.
आर्थिक वर्ष २०२०-२३ मध्ये उत्पादनात ६.६ टक्क्यांच्या घटीसह आर्थिक घडामोडीत उल्लेखनीय घसरण झाली आहे. सीईबीआरने अहवालात म्हटले आहे की, देशांतर्गत मागणीमधील तेजीमुळे आर्थिक घडामोडीला वेग आला आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये सकल देशांतर्गत उत्पादनात ८.७ टक्के वाढ झाली. त्यामुळे भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे. सीईबीआरला आता भारतामध्ये आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ६.८ टक्क्यांच्या मजबुत वाढीची अपेक्षा आहे. अहवालात म्हटले आहे की, भारतातील महागाई बहुतांश मोठ्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत कमी होत आहे.