भारत जगातील द्वितीय क्रमांकाचा ऊस उत्पादक देश आहे. देशात सर्वाधिक ऊस उत्पादन करून साखर निर्यात केली जाते. देशातील ऊस उत्पादन क्षेत्रात उत्तर प्रदेशचे नाव पहिल्या क्रमांकावर घेतले जाते. येथील शेतकरी ऊस पेरणीपासून त्याच्या विक्रीपर्यंत सर्व स्तरावर कार्यरत असतात. यासंदर्भात त्यांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी खास सुविधा दिली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेल्पलाइन आणि आधुनिक सुविधांनीयुक्त कंट्रोल रुम सुरू करण्यात आली आहे.
ट्रॅक्टरजंक्शन वेबसाइटने दिलेल्या वृत्तानार, ऊस विकास विभागाच्यावतीने सुरू झालेल्या या हेल्पलाइनच्या क्रमांकावर संपर्क साधून शेतकरी आपल्या समस्यांवर तोडगा काढू शकतात. कॉल सेंटरवरील कर्मचाऱ्यांचे काम सुलभ व्हावे यासाठी कंट्रोल रुम एन. कम्प्युटिंग सिस्टिम, इपीबी एक्स, इंटरकॉम आणि वेब बेस्ड सॉफ्टवेअर अशा साधनांनी सुसज्ज आहे. येथील टोल फ्री क्रांकावर अनुभवी कर्मचारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २४ तास मार्गदर्शन करतील. राज्यात २०२२-२३ मध्ये एकूण २८.५३ लाख हेक्टर ऊस क्षेत्र आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ८४ हजार हेक्टरने क्षेत्र वाढले असून ऊस उत्पादन २३५० लाख हेक्टर राहील अशी शक्यता आहे. यंदा ११० लाख टन साखर उत्पादन होईल असे अनुमान वर्तविण्यात आले आहे. अशा स्थितीत राज्यातील शेतकऱ्यांना या कंट्रोल रुममधून समस्या सोडविण्यासाठी मदत मिळणार आहे.