तामिळनाडू : कामगारांच्या तुटवड्यामुळे ऊस तोडणीवर परिणाम

धर्मपरीमध्ये दोन साखर कारखाने सुरू झाल्यानंतरही कामगारांच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर ऊस तोडणी करणे शक्य झालेले नाही. पालाकोडमधील धर्मपुरी सहकारी साखर कारखाना आणि गोपालपुरममधील सुब्रमण्य शिव सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी डिसेंबरमध्ये गाळपास सुरुवात केली आहे. यावर्षी ११२०.८ मि.मी. अतिरिक्त पावसामळे धर्मपुरीमधील शेती बहरली आहे. दोन्ही कारखान्यांकडे गाळपासाठी २०,५७७ एकरातील ऊस नोंदणी झालेला आहे. मात्र, कामगारांचा तुटवडा आणि उच्च उत्पादन खर्चामुळे मागणी वाढली आहे.

कडागथूरचे शेतकरी एस. पेरुमल यांनी सांगितले की, “सद्यस्थितीत आम्ही तोडणी कामगार मिळविण्यासाठी संघर्ष करीत आहोत. या वर्षी पिकाला पुरेसे पाणी मिळाले आहे आणि शेतीकामात अडचणी आलेल्या नाहीत. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा शेतीचे लागवड क्षेत्र वाढले आहे. या सर्व बाबी चांगल्या असल्या तरी कामगारांचा तुटवडा ही शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या बनली आहे. दोन्ही कारखाने सातत्याने खुले आहेत. आणि त्यामुळे मागणीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी कामगार नाहीत, काही शेतकऱ्यांनी पिकाच्या हंगामात त्यांच्याकडे आधीच संपर्क साधला आहे. कामगारांचा तुटवडा आणि उच्च उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्यांचा नफा कमी होत आहे.”

द इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आम्ही ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर मागविले आहेत. आणि शेतकरी याचा वापर करू शकतात. ते एका तासात एक एकरातील पिकाची तोडणी करतात. आम्ही शेतकऱ्यांना हा पर्याय विचारात घेण्याचे आवाहन केले आहे. शेकडो शेतकरी याचा वापर करीत आहेत आणि तोडणी करण्यासाठी मागणीतही वाढ झाली आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here