कोकिंग कोळसा उत्पादनात आणखी वाढ करण्याच्या दृष्टीने, कोळसा मंत्रालयाने चार कोकिंग कोळसा खाणक्षेत्रं निश्चित केली आहेत तसेच केंद्रीय खाण नियोजन आणि रचना संस्था (सीएमपीडीआय) येत्या काही महिन्यांत 4 ते 6 नवीन कोकिंग कोल खाणक्षेत्रांसाठी भूगर्भशास्त्रीय अहवालाला (GR) अंतिम स्वरूप देईल.देशांतर्गत कच्च्या कोकिंग कोळशाचा पुरवठा आणखी वाढवण्यासाठी ही खाणक्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी लिलावाच्या पुढील फेऱ्यांमध्ये सादर केली जाऊ शकतात.
आत्मनिर्भर भारत अंतर्गत मंत्रालयाने हाती घेतलेल्या या उपाययोजनांमुळे, देशांतर्गत कच्च्या कोकिंग कोळशाचे उत्पादन 2030 पर्यंत 140 दशलक्ष टन (एमटी ) पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कोल इंडिया लिमिटेडने (सीआयएल) विद्यमान खाणींमधून कच्च्या कोकिंग कोळशाचे उत्पादन 26 मेट्रीक टन पर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे आणि आर्थिक वर्ष 2025 पर्यंत सुमारे 22 मेट्रिक टन उच्च दर क्षमता (पीआरसी) असलेल्या नऊ नवीन खाणी निश्चित केल्या आहेत.तसेच, कोल इंडिया लिमिटेडने 2 मेट्रिक टनांच्या उच्च दर क्षमतेसह खाजगी क्षेत्राला महसूल वाटपाच्या नाविन्यपूर्ण मॉडेलवर आधारित एकूण 30 बंद खाणींपैकी आठ बंद केलेल्या कोकिंग कोळसा खाणी देऊ केल्या आहेत.
(Source: PIB)