कोविडशी संबंधित वस्तूंच्या निर्यातीबाबत कठोर निर्णय शक्य, सरकार उचलणार मोठे पाऊल

देशात वाढत्या कोविड रुग्ण संख्येदरम्यान, कोविडशी संबंधित वस्तूंच्या निर्यातीवर सरकारने देखरेख वाढवली आहे. देशात कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ झाली तर सरकार या वस्तूंच्या निर्यातीबाबत कठोर निर्णय घेवू शकते. सरकारने देशात उत्पादन केल्या जाणाऱ्या पीपीई कीट, पॅरासिटामॉलच्या निर्यातीवरही लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्जिकल मास्कचा यात समावेश असेल.

एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, चीन, जपान, दक्षिण कोरिया यांच्यासह इतर काही देशात कोविडच्या नव्या व्हेरियंटच्या रुग्णांत वाढ झली आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील या वस्तूंच्या मागणीत वाढ झाली आहे. याबाबत सरकारने एक उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यामुळे कोविडशी संबंधीत वस्तूंच्या एक्स्पोर्टवरील नियंत्रण वाढवले जाईल असा निर्णय घेण्यात आला. पीपीई कीट, पॅरासिटामॉल, सर्जिकल मास्क, व्हेंटिलेटर्सच्या निर्यातीवर देखरेख वाढवली जाईल. पुढील चाळीस दिवस कोविडच्या अनुषंगाने महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here