जागतिक अन्न संकटाच्या पार्श्वभूमीवर हायब्रीड गव्हाच्या उत्पादनाकडे लक्ष

अमेरिकन शेतकऱ्यांनी गव्हाच्या एका नव्या प्रजातीवर काम करणे सुरू केले आहे. कृषी क्षेत्रातील दिग्गज सिंजेंटा कंपनीने हे वाण विकसित केले आहे. जनुकीय बदल न करता तयार होणाऱ्या या गव्हाच्या मदतीने अन्नधान्याच्या कमतरतेच्या समस्येवर मात करता येते असे सांगितले जात आहे. सिंजेंटा जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीची मालकी चीनकडे आहे. कंपनी पुढील वर्षी पाच हजार ते सात हजार एकर जमिनीवर नव्या प्रकारच्या गव्हाची शेती करणार आहे. हा गहू हायब्रीड प्रकारचा असेल. अमेरिकेत गव्हाच्या शेतीसाठी वापरले जाणारे क्षेत्र एकूण क्षेत्रफळाच्या खूप कमी आहे. याशिवाय जर्मन कंपन्या बीएएसएफ एसई आणि बायर एजी यांनीही या दशकाच्या अखेरपर्यंत गव्हाच्या आपल्या नव्या वाणाचे सादरीकरण करण्याची तयारी सुरू केली आहे.

देशबंधू वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, सामान्य गव्हाच्या रोपांची स्वतःचे परागीकरण करण्याची नैसर्गिक क्षमता काढून टाकून कृषी संशोधक संकरित गहू विकसित करतात, जेणेकरून शेतातील मादी वनस्पती इतर प्रकारच्या नर वनस्पतींद्वारे परागणित होतात. अशा प्रकारे या कृषी वंशातील दोन भिन्न प्रजातींच्या एकत्रीकरणातून तयार होणाऱ्या नवीन गव्हाच्या बियाण्याला संकरित म्हटले जाते. गव्हाच्या दोन भिन्न प्रजातींच्या एकत्र येण्याने तयार झालेले बियाणे केवळ अधिक उत्पादनच मिळते असे नाही तर त्या रोपांची प्रतिकूल पर्यावरण, हवामानात टिकून राहण्याची क्षमता अधिक असते. साधारणतः १९३० पासून जगभरातील विविध देशांमधील शेतकऱ्यांकडून मक्क्याच्या हायब्रीड पिकाचे उत्पादन घेतले जाते. कांदा, पालक, टोमॅटो आदींच्या हायब्रीड वाणांचाही यात समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here