ब्राझीलमध्ये ५९८ मिलियन टन ऊस उत्पादन होण्याची शक्यता

साओ पाउलो : ब्राझीलची राष्ट्रीय पुरवठादार कंपनी Conab ने देशातील २०२२-२३ या हंगामातील ऊस पिकाचे उत्पादन आणि उत्पादकतेबाबतचे आपले पुर्वानुमान अपडेट केले आहे. Conabने दिलेल्या अहावालनुसार, देशात ऊस उत्पादन ५९८.३ मिलियन टन होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे २०२१-२२ या गेल्या हंगामाच्या तुलनेत देशातील ऊस उत्पादनात २.२ टक्क्यांची वाढ होऊ शकते हे स्पष्ट झाले आहे.

Conab च्या या सर्वेक्षणानुसार असे दिसून येते की, ब्राझीलमध्ये या वर्षी ३६.४ मिलियन टन साखरेचे उत्पादन होईल, जे गेल्या हंगामाच्या २०२१-२२ मधील उत्पादनाच्या तुलनेत ४.१ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत इथेनॉल उत्पादनामध्ये ४.२ टक्क्यांची वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here