संशोधकांनी विकसित केले गहू, उसाचे नवे वाण, मिळणार बंपर उत्पादन

नवी दिल्ली : हंगाम रब्बी असो वा खरीप, पिकाचे चांगले उत्पादन मिळावे असा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. त्यासाठी ते चांगल्या प्रजातीचे वाण वापरतात. संशोधकही अशा प्रजाती विकसित करण्याचा प्रयत्न करतात, की ज्यांच्यापासून अधिक उत्पादन मिळेल, त्या पिकावर किटक अथवा रोगांचा हल्ला होणार नाही. मात्र, या नव्या प्रजाती जु्न्या झाल्यावर त्यावरही रोगांचा हल्ला दिसून येतो. त्यामुळे बिहारच्या ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी गहू आणि उसाच्या नवा प्रजाती विकसित केल्या आहेत. त्या बंपर उत्पादन देणाऱ्या आहेत.

एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार बिहारच्या पश्चिम चंपारण्य येथील ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीने गहू, उसाच्या नव्या प्रजाती विकसित केल्या आहेत. गव्हाची पीबीडब्ल्यू १८७, ३२२, २५२ तसेच राजेंद्र गोंड तीन विकसित करण्यात आल्या आहेत. पीबीडब्ल्यूचे उत्पादन प्रती हेक्टर ७० ते ७५ क्विंटल प्रती हेक्टर आहे. यामध्ये आयर्न आणि पोषक तत्त्वे अधिक आहेत. राजेंद्र तीन गव्हाच्या प्रजातीचे उत्पादन ५० ते ५५ क्विंटल प्रती हेक्टर आहे. उसाच्या प्रजातींमध्ये १४२०१, १५०२३, राजेंद्र ऊस १, २, ३ यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात हा ऊस विकसित करण्यात आला आहे. त्याचे परिणाम चांगले असल्याचे दिसून येत आहे. त्याची रोग प्रतिकारक शक्ती अधिक असून लवकरच हे वाण शेतकऱ्यांसाठी खुले केले जातील असे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here