उत्तर प्रदेशमध्ये बड्या कंपन्यांची गुंतवणूक आणण्याकडे राज्य सरकारची नजर

लखनौ : उत्तर प्रदेश सरकारकडून फेब्रुवारी महिन्यात लखनौमध्ये ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचे आयोजन करण्यात आले होते. या समिटच्या माध्यमातून उत्तर प्रदेशात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आणण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. ब्रिटानिया, कोका कोला यांसारख्या बड्या कंपन्यांकडून टीम योगी आदित्यनाथ जानेवारी महिन्यात गुंतवणूक मिळविण्यासाठी देशातील प्रमुख सात शहरांचा दौरा करण्यासाठी तयार आहेत. उत्तर प्रदेशात गुंतवणूक आणण्याच्या प्रयत्नांमध्ये सरकारने अजिबित कसर सोडलेली नाही.

विदेशी गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळविल्यानंतर टीम आता भारतीय बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांकडून अपेक्षा करीत आहे. या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री योगी यांच्यासह मंत्री आणि अधिकारी ४० हून अधिक बड्या कंपन्यांशी संपर्क साधतील आणि त्यांना उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करतील. उत्तर प्रदेशात १० ते १२ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत लखनौमध्ये ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट होईल. फेडरेशन ऑफ द इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) (Federation of the Indian Chamber of Commerce and Industry) आणि भारतीय उद्योग परिसंघ (CII) (Confederation of Indian Industries) सर्व सात शहरांमध्ये रोड शो आयोजित करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची मदत करेल. सरकार देशांतर्गत दिग्गजांसोबत देशातील सात महानगरांमध्ये मुंबई, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, अहमदाबाद, चेन्नई आणि बेंगळुरूमध्ये उच्चस्तरीय बैठक घेतील.

गोदरेज, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा ग्रुप, जेएसडब्ल्यू ग्रुप, एशियन पेंट्स, ब्रिटानिया, आदित्य बिर्ला ग्रुप, बॉम्बे डाइंग, नेस्ले, कोका कोला, डीसीएम श्रीराम, एसआरएफसह युपी सरकार ज्या बड्या कंपन्यांपर्यंत पोहोचू इच्छित आहे, त्यामध्ये वर्धमान, त्रिवेणी इंजिनीअरिंग, हिडलबर्ग सिमेंट, सब्रोस, मारुती, सुझुकी, हिरो मोटोकॉर्प, आयशर, नोकिया, अशोक लेलँड, सुंदरम फास्टनर्स, सुंदरम क्लेटन, टिव्हीएस मोटर्स, एलअँडटी, ग्रँडफोस पंप्स, एल्गी, लक्ष्मी मिल्स, बर्जर पेंट्स, एक्साइड, टेक्समॅको , आरपी संजीव गोयनका ग्रुप, वॉकहार्ट, आईटीसी, एवरेडी, अदानी ग्रुप, टोरेंट ग्रुप, हिताची, रसना, अमूल, ओसवाल इंडस्ट्रीज, अरविंद मिल्स, ईसीआयएल, एच.पी., अमारा राजा, रामके, लाफार्ज, मेरिनो फुड्स, डिव्ही लॅब, डेल, आयबीएम, सँटम इलेक्ट्रॉनिक्स, एबीबी, वोल्व्हो, टोयोटा, हनीवेल, बॉश, बायोकॉन आणि हॉल कंपनीसह इतर कंपन्यांचाही समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here