डिझेलसह एटीएफची आयात महागली, सरकारकडून विंडफॉल टॅक्समध्ये वाढ

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पेट्रोलियम, कच्चे तेल आणि विमान टर्बाइन इंधनावरील विंडफॉल टॅक्स वाढवला आहे. देशांतर्गत स्तरावर उत्पादित कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्सही वाढविण्यात आला आहे. सरकारने हा कर १७०० रुपये (२०.५५ डॉलर) वरुन वाढवून २१०० रुपये (२५.३८ डॉलर) प्रती टन केला आहे. नवे दर मंगळवारी, ३ जानेवारीपासून लागू करण्यात आले आहे. सरकारने डिझेलवरील निर्यात कर ५ रुपयांवरुन वाढवून ७.५ रुपये प्रती लिटर केला आहे. तर एटीएफवरील विंडफॉल टॅक्स १.५ रुपयांवरून ४.५ रुपये प्रती लिटर केला आहे.

आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गेल्यावेळी केंद्र सरकारने अप्रत्यक्षरित्या विंडफॉल टॅक्स ४९०० रुपये प्रती टनावरुन १७०० रुपये प्रती टन केला होता. पेट्रोलवरील स्पेशल अॅडिशनल एक्साइज ड्यूटी शुन्यवर जैसे थे ठेवण्यात आली आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा तेल आयातदार देशांपैकी एक आहे. अहवालानुसार, भारत सध्या रशियाकडून क्रूड ऑईल खरेदी करत आहे. जुलै २०२२ मध्ये भारत कच्च्या तेल उत्पादकांवर विंडफॉल टॅक्स लागू करून त्या देशांमध्ये आपला समावेश केला होता, जे एनर्जी कंपन्यांच्या नफ्यावर कर आकारणी करतात. जागतिक मार्केटमध्ये क्रुड ऑईल, पेट्रोल, डिझेल, एटीएफसारख्या रिफायनरी उत्पादनाचे दर वेळोवेळी कमी-अधिक होत असतात. निश्चित मर्यादेवर नफ्यावर विंडफॉल टॅक्सची आकारणी केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here