मवाना साखर कारखान्याकडून ३९.४८ कोटींची ऊस बिले अदा

मवाना : मवाना साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२२-२३ मधील १० डिसेंबर ते १९ डिसेंबर २०२२ या कालावधीत खरेदी करण्यात आलेल्या उसापोटी ३९.४८ कोटी रुपये संबंधीत समितीला पाठवले आहेत. सहकारी ऊस समिती मनावाचे सचिव नरेश कुमार यांनी सांगितले की, हे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवले जातील. हंगाम २०२२-२३ मध्ये दोन जानेवारी २०२३ पर्यंत मवाना साखर कारखान्याने एकूम ६७.६४ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. शेतकऱ्यांना आतापर्यंत कारखान्याने १७८.५८ कोटी रुपयांची ऊस बिले दिली आहेत.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मवाना कारखान्याचे ऊस तथा प्रशासन विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रमोद बालियान यांनी विभागातील शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, कारखान्याकडून एसएमएस पाठविल्यानंतरच त्यांनी उसाची तोडणी करावी. ऊस खरेदी केंद्रे तसेच कारखान्याच्या गेटवर साफ, स्वच्छ आणि ताजा ऊस पाठवावा. अनेक शेतकरी ऊस बांधण्यास पाल्याचा वापर करतात. त्यामुळे साखरेचा उतारा घटतो. यासोबतच वसंत ऋतुकालीन ऊस लागवडीत शेतकऱ्यांनी को ०११८, को १५०२३, कोसी १३२३५ आणि कोएल १४२०१ या प्रजातीच्या उसाचे बियाणे वापरावे. ऊस खरेदी केंद्रांवर वेळेआधीच ऊस आणू नये असे आवाहनही बालियान यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here