साओ पाउलो/न्यूयॉर्क : साखर उद्योगातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, ब्राझीलचे नवे राष्ट्रपती लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्या इंधनाला करातून सूट देण्याच्या आदेशामुळे बाजारपेठेला आश्चर्याचा धक्का बसला आहे. साखर उद्योग विश्लेषकांच्या मते या निर्णयाचा ब्राझिलियन साखर आणि इथेनॉल कंपन्यांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
गेल्या आठवड्यात अर्थमंत्री फर्नांडो हद्दाद यांनी दिलेल्या संकेतानंतर साखर आणि इथेनॉल उद्योग तसेच आंतरराष्ट्रीय साखर व्यावसायिक पेट्रोल आणि इथेनॉलवर फेडरल कर पुनर्स्थापित होण्याची अपेक्षा करत होते.
याबाबत सिटी रिसर्चच्या म्हणण्यानुसार, या उपायाचा S&E क्षेत्रावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कारण ते इथेनॉलच्या किमती बाजाराच्या अंदाजापेक्षा कमी ठेवू शकतात. तसेच २०२३ च्या सुरुवातीला इथेनॉलच्या किमती वाढतील अशी अपेक्षा होती.