रोहटक : उसाच्या दरात वाढ करून तो प्रती क्विंटल ४५० रुपये केला नाही तर राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा हरियाणातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी याप्रश्नी राज्य सरकारला एक आठवड्याची मुदत दिली आहे. जर सरकारने दरवाढ दिली नाही, तर जिल्ह्यातील दोन्ही साखर कारखाने, मेहम आणि रोहटक बंद पाडले जातील, अशा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत दि ट्रिब्यून मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी सांगितले की, यापूर्वी हरियाणातील उसाचा दर देशात सर्वाधिक असत होता. मात्र, आता शेजारील पंजाब आणि उत्तर प्रदेशातील राज्यांच्या तुलनेत हा दर कमी आहे. अखिल भारतीय किसान सभेचे (AIKS) जिल्हाध्यक्ष प्रित सिंह यांनी सांगितले की, पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जादा दर मिळत आहे. तर हरियाणातील शेतकऱ्यांना केवळ ३६२ रुपये प्रती क्विंटल दर मिळतो. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी, त्यांच्या श्रमाचे योग्य मूल्य देण्याऐवजी सरकारकडून चालविल्या जाणाऱ्या आणि सहकारी साखर कारखान्यांचे खाजगीकरण करण्याच्या उद्देशाने रंगराजन समितीच्या शिफारसी लागू करण्याचा प्रयत्न चालविण्यात आला आहे.