देशात इथेनॉल पंप स्थापन करण्याच्या धोरणावर काम सुरू : मंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली : केंद्र सरकार देशात इथेनॉल पंप स्थापन करण्याच्या धोरणावर काम करीत आहे, असे केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सीआयआयद्वारे आयोजित जैव ऊर्जा शिखर परिषदेत बोलताना सांगितले. इथेनॉल पंप स्थापन करण्यासाठी धोरण आखले जावे, यासाठी मी १५ दिवसांत पेट्रोलियम मंत्र्यांची भेट घेणार आहे. देशात इथेनॉल उत्पादन क्षमता वाढली आहे. आणि बांगलादेशातूनही याची मागणी आहे, असे त्यांनी सांगितले.

मंत्री गडकरी म्हणाले की, पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्यासाठी १००० कोटी लिटर इथेनॉलची गरज भासेल. आता बजाज, हिरो आणि टिव्हीएसकडे अशा मोटारसायकली तयार आहेत, ज्या १०० टक्के बायोइथेनॉलवर चालू शकतात. आमच्याकडे यावर चालणाऱ्या ऑटोरिक्षाही असू शकतात. ते म्हणाले की, भारत आयातीवरील अवलंबित्वामध्ये कपात आणि स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी जीवाश्म ईंधनावर चालणाऱ्या वाहनांना पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये बदलण्यावर भर देत आहे. गडकरी यांच्या म्हणण्यानुसार, देशात १६ लाख कोटी रुपये इंधन आयात बिल हे एक आव्हान आहे आणि ते दूर करण्याची गरज आहे.

स्थापन करण्यात येणाऱ्या इथेनॉल वितरण आऊटलेटच्या स्थितीवर टिप्पणी करताना ते म्हणाले की, आमच्याकडे पुण्यामध्ये तीन इथेनॉल पंप आहेत. मात्र, आता आम्हाला फ्लेक्स इंधनावर चालणाऱ्या आणि पंपांसोबत समन्वय करण्यासाठी स्कूटर, रिक्षांची गरज आहे. उत्तर प्रदेशमध्ये त्याचा प्रसार केला जावू शकतो. आणि राज्यातही सर्व स्कूटर, ऑटो रिक्शा बायो-इथेनॉलवर चालू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here