तंजावर : जिल्ह्यातील शेतकरी ऊसाच्या कमी खरेदी दरामुळे खूप नाराज आहेत. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, व्यापाऱ्यांनी गेल्यावर्षी १७ ते २० रुपये यादरम्यान उसाची खरेदी केली होती. मात्र, यंदा केवळ १२ ते १३ रुपये दर दिला जात आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पोंगल करुम्बू ऊसाची दरवर्षी जिल्ह्यात केवळ ३०० हेक्टरमध्ये शेती केली जाते. मात्र, शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, रेशन कार्डधारकांसाठीखरेदी करण्यात आलेल्या ऊसाचे प्रमाण ऊस शेतीच्या तुलनेत अयोग्य आहे.
याशिवाय, शेतकरी आपल्या उत्पादनाला कमी दर देणाऱ्या व्यापाऱ्यांविषयी तक्रारी करत आहेत. यावर्षी अधिकाऱ्यांनी सरकारी आदेशानुसार केवळ सहा फूट उंच उसाची खरेदी करण्यावर भर दिला आहे. शेतकऱ्यांना केवळ १२ ते १५ रुपये प्रती ऊस दर देणारे व्यापारी शुक्रवारी तंजावर आणि परसिरातील ग्राहकांना प्रती ऊस २० रुपये अथवा ३० रुपये आकारत आहेत. एका व्यापाऱ्याने सांगितले की, ग्राहकांच्या मागणीच्या आधारावर पोंगलच्या पूर्वसंध्येपर्यंत किमतीत उतार-चढाव होणे शक्य आहे.