पाकिस्तानमध्ये गव्हासाठी नागरिकांमध्ये मारामारी, ट्रकच्या मागे धावताना दिसले शेकडो लोक

पाकिस्तानमध्ये अन्न संकट अधिक गडद होताना दिसून येत आहे. यादरम्यान, शेकडो लोक आपल्या मोटारसायकली घेवून गव्हाच्या ट्रकचा पाठलाग करताना दिसत आहेत. एक पोते गहू मिळविण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहेत. नॅशनल इक्वॅलिटी पार्टी जेकेजीबीएलचे अध्यक्ष प्रा. सज्जाद राजा यांनी याबाबतचा व्हिडिओ प्रसारीत करताना म्हटले आहे की, ही काही मोटारसायकल रॅली नाही. तर पाकिस्तानमधील लोक आटा मिळविण्यासाठी एका ट्रकचा पाठलाग करीत आहेत. त्यांची एवढीच अपेक्षा आहे की, त्यांना फक्त एक पाकीट आटा खरेदी करता येईल. पाकिस्तानमध्ये आमचे काही भविष्य आहे का? असा सवाल करत त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्वीट केला आहे.

याबाबत अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सोशल मीडियात शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये काही लोक मोटारसायकलवरून एका आट्याच्या ट्रकचा पाठलाग करताना दिसत आहेत. हे लोक आटा खरेदी करम्यासाठी वाहनाचा पाठलाग करीत आहेत. गव्हाच्या ट्रकजवळ पोहोचलेला एकजण पैसे देवून आट्याची मागणी करताना दिसतो. त्यांनी पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरच्या रहिवाशांनाही आपले डोळे उघडण्याचा सल्ला दिला आहे. पीओकेमध्ये गेल्या सात दशकांपासून लोक भेदभाव सहन करीत आहेत. त्यामुळे आज अशी स्थिती तयार झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. पीओकेमध्येही धान्य संकट अधिक गंभीर आहे. बाग आणि मुजफ्फराबादसह विभागात आट्याची मोठी टंचा ई आहे. लोकांमध्ये याबाबत जोरदार संतप्त भावना आहेत. लोक इस्लामाबाद आणि पाकिस्तान सरकारला याबाबत जबाबदार ठरवत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here