नवी दिल्ली : मारुती सुझुकी डिझेल इंजिनचा वापर पूर्णपणे बंद करणाऱ्या पहिल्या कार उत्पादकांपैकी एक आहे. कारण, डिझेलवरील गुंतवणूक आणि हार्डवेअर बदलांमुळे खर्च वाढला असता आणि नंतर ग्राहकांसाठी किमतींमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली असती. त्याऐवजी कंपनीने ईव्हीएक्स कन्सेप्टवर पूर्ण इलेक्ट्रिक वाहनांच्या मार्गावर जाण्यासह हायब्रिड पर्याय आणि फ्लेक्स-फ्युएलचा पर्याय निवडला. त्याचे सादरीकरण ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये करण्यात आले.
मारुती सुझुकी इंडियाचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी सी. व्ही. रामन यांनी सांगितले की, कंपनी २०२५ पर्यंत फ्लेक्स-फ्युएल इंधन वाहने आणि इथेनॉल उत्पादनासाठी एक पूर्ण रोडमॅप तयार करण्यासाठी सरकारसोबत चर्चा करीत आहे.
AutoExpo २०२३ च्या कार्यक्रमादरम्यान, FinancialExpressने सी. व्ही. रामन यांच्यासोबत चर्चा केली. त्यांच्यासोबत कंपनीच्यावतीने आगामी काळात येणाऱ्या फ्लेक्स-फ्युएल कार, हायब्रीड तसेच शुद्ध ईव्हीएस अशा विविध तंत्राबाबत चर्चा केली. कंपनीने शुद्ध ईव्हीसाठी आधीच १०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.
अधिक इंधन सुरक्षेच्या शोधात कंपनीकडे सद्यस्थितीत आपल्या अनेक मॉडेल्समध्ये मजबूत हायब्रिड पेट्रोल-इलेक्ट्रिक वाहनांसह माइल्ड हायब्रिड इलेक्टिकली असिस्टेड पेट्रोल वाहनांसाठीही एक इंधन पर्याय आहे. मजबूत हायब्रिड मानक पेट्रोल-ओन्ली कार्सच्या तुलनेत ३५ टक्के चांगल्या इंधनाची कार्यक्षमता मिळू शकते. तर माइल्ड हायब्रिड तंत्रज्ञान जवळपास ७ टक्के चांगली कार्यक्षमता देते. कंपनी अशा खरेदीदारांसाठी सीएनजी-पेट्रोल हायब्रिडसुद्धा सादर करते, जे वाहन चालविण्यावरील खर्च पैसे कमी करू इच्छितात.
मारुती सुझुकीनेसुद्धा इथेनॉल मिश्रीत इंधनावर चालणारी अधिकाधिक वाहने लाँच करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. सुरुवातीला पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण, नंतर ८५ टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रणापर्यंत यात वाढ केली जावू शकते. त्यांच्याकडून एक्स्पोमध्ये एका फ्लेक्स – फ्युएल (E८५ सक्षम) वॅगन-आरचे सादरीकरण करण्यात आले. फ्लेक्स-फ्युएल इंधनावाली वाहने शुद्ध पेट्रोलवर अथवा ८५ टक्के पर्यंत इथेनॉल मिश्रण असे कोणत्याही प्रकारे चालू शकतात. ही एक अशी पद्धती आहे की जी कार्बनसाठी नकारात्मक आहे आणि कृषी उत्पन्नात वाढ करू शकते.