चंदीगढ : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते भुपिंदर सिंह हुड्डा यांनी राज्य सरकारने उशीर न करता तातडीने ऊस दरात वाढ करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, ऊसाच्या एसएपी (राज्य सल्लागार मूल्य) वाढीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य आहेत. शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने या प्रश्नी हुड्डा यांची भेट घेतली होती.
हुड्डा म्हणाले की, काँग्रेस पूर्णपणे शेतकऱ्यांसोबत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी विधानसभेत पक्षाने मांडली आहे. ते म्हणाले की, ऊस हंगाम समाप्त होऊ लागला आहे. मात्र, आतापर्यंत सरकारने एक पैशाचीही दरवाढ केली नाही.