नेपाळ सरकारकडून ऊस दरात वाढ

काठमांडू : नेपाळ सरकारने अखेर या वर्षासाठी उसाचे किमान समर्थन मूल्य निश्चित केले आहे. कृषी आणि पशूधनविकास मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, सरकारने ऊसाचे समर्थन मूल्य ६१० रुपये प्रती क्विंटल निश्चित केले आहे. गेल्यावर्षी ऊसाच्या किमान समर्थन दरात ८.३९ टक्के वाढ झाली होती. हा दर प्रती क्विंटल ५९० रुपये होता. किमान समर्थन मूल्य शेतकऱ्यांसाठी दरवर्षी निश्चित केला जातो. सरकारने दर निश्चितीस उशीर केल्यामुळे साखर कारखाने ५९० रुपये या गेल्यावर्षीच्या दराने ऊस खरेदी करीत होते. आता कारखान्यांनी सांगितले की, सरकारने जाहीर केलेल्या किमान समर्थन दरानुसार नव्या दराने बिले दिली जातील.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ६१० रुपये प्रती क्विंटलपैकी ५४० रुपये ऊसाचे किमान समर्थन मूल्य आहे. यामध्ये वाहतूक खर्च, उत्पादन खर्च आणि नफा यांचा समावेश आहे. अशा पद्धतीने यावर्षी प्रती क्विंटल ७० रुपये अनुदान सरकारकडून दिले जाईल.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सरकारने ऊस दर निश्चितीत उशीर केला. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव आपला ऊस गूळ युनिट्सना ३३० ते ३५० रुपये प्रती क्विंटल दराने विकला. ऊसाचा हंगाम नोव्हेंबरच्या मध्यापासून सुरू होतो. फेडरेशन ऑफ शुगर प्रोड्यूसर्स असोसिएशनचे अध्यक्ष कपिल मुनी मेनली यांनी सांगितले की, सरकारने ही दर निश्चिती डिसेंबरच्या मध्यापर्यंत करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here