आता नव्या उच्चांकावर पोहोचले गव्हाचे दर

नवी दिल्ली : या महिन्याच्या सुरुवातीपासून गव्हाच्या किमती नव्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. अशा स्थितीत केंद्र सरकार खुल्या बाजारात याची कधी विक्री करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. व्यापार क्षेत्राशी संलग्न सुत्रांनी सांगितले की, भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) अधिकाऱ्यांवर अलिकडेच झालेली छापेमारी आणि एफसीआयच्या भांडारातील साठा यावर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर खुल्या बाजारातील विक्रीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार, अधिकृत आकडेवारीनुसार दिसून येते की एक जानेवारी २०२३ रोजी केंद्रीय भांडारात भारताचा गव्हाचा साठा १७१.७ लाख टन होता. धोरणात्मक साठ्यापेक्षा हे प्रमाण २४.४ टक्के अधिक आहे. केंद्रीय भांडारातील १७१.७ लाख टन गव्हापैकी १०५ लाख टन (जवळपास ६१ टक्के) गहू राज्यांतील विविध घटकांकडे आहे. त्यानंतरही १ जानेवारी ते १७ जानेवारी या दरम्यान दिल्लीतील लॉरेन्स रोड मार्केटमध्ये गव्हाचा दर २९०० रुपये प्रती क्विंटलवरून ३०६० ते ३१०० रुपये प्रती क्विंटल झाला आहे. अवघ्या २० दिवसांत दरात ३ ते ७ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. त्यामुळे फ्लोअर मील मालकांनी सरकारकडे गव्हाची खुल्या बाजारात विक्री करण्याची मागणी केली आहे. तरच दर काही प्रमाणात घटू शकतात असे त्यांचे म्हणणए आहे. आयग्रेन इंडियाचे विश्लेषक राहुल चौहान यास दुजोरा दिला. घाऊक विक्रेत्यांकडील साठा संपला असल्याने मागणी गतीने वाढल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here