क्रूड ऑईल ८५ डॉलर प्रती बॅरलवर, देशात पेट्रोल, डिझेलचे दर जैसे थे

पेट्रोल, डिझेलच्या किमतीत दीर्घ काळापासून बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईल गेल्या काही दिवसांपासून ८५ डॉलर प्रती बॅरल या दरावर आहे. भारतीय इंधन कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज, म्हणजे २५ जानेवारी रोजी पेट्रोल, डिझेलचे दर बदलण्यात आलेले नाहीत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाइट iocl.com च्या लेटेस्ट अपडेटनुसार, देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपयांवर स्थिर आहे. चेन्नई पेट्रोल १०२.६३ आणि डिझेल ९४.२४ रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रती लिटर दराने विक्री केले जात आहे. याशिवाय देशाची आर्थिक राजधानी मुंबई पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रती लिटर आहे.

आज तकमधील वृत्तानुसार, राज्यांच्या स्तरावर लागू केल्या जाणाऱ्या विविध करांमुळे वेगवेगळ्या राज्यांत पेट्रोल, डिझेलच्या किमती वेगवेगळ्या आहेत. एका SMSवर तुम्ही शहरातील पेट्रोल, डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP लिहून मेसेज ९२२४९९२२४९ वर पाठवावा लागेल. आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलच्या आधारावर ऑईल मार्केटिंग कंपन्या किमतीचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल, डिझेलच्या दरांची निश्चिती करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्या विविध शहरांतील इंधन दरात अपडेट करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here