केंद्र सरकार लवकरच साखर निर्यातीचा कोटा वाढवण्याची शक्यता : देवेंद्र फडणवीस

नवी दिल्‍ली : केंद्र सरकार लवकरच साखरेचा निर्यात कोटा वाढवेल आणि राज्यातील आजारी साखर उद्योगाच्या मदतीसाठी पावले उचलले, असे आश्वासन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी महाराष्ट्रातील नेत्यांना दिले. शहा यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांसोबतच्या बैठकीत वरील आश्वासन दिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या शिष्टमंडळाचा भाग होते.

फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले की, निर्यात कोटा समाप्त झाला आहे. महाराष्ट्र हे किनारपट्टीवरील राज्य असल्याने, आम्ही आमच्या बंदरांच्या माध्यमातून साखर निर्यात करू शकतो. मंत्री शहा यांनी या मुद्यावरही रचनात्मक दृष्टिकोनातून विचार केला आणि आम्ही कोटा वाढवणे अथवा यासंबंधी योग्य निर्णय घेवू असे सांगितले. बैठकीस रावसाहेब पाटील-दानवे, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यासह इतर नेत्यांनी सहभाग घेतला. मुख्‍यमंत्री शिंदे म्हणाले की, शिष्टमंडळाने शहा यांना खेळते भांडवल, मार्जिन मनी, स्टँडअलोन इथेनॉल प्लांट उभारण्यासाठी लागणारा निधी आणि कर्ज पुनर्गठनाबाबत साखर क्षेत्राला भेडसावणाऱ्या अडचणींची माहिती दिली.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की, साखरेसाठी निर्यात कोटा ६० लाख टन निश्चित करण्यात आला होता आणि याला कमीत कमी २० लाख टनाने वाढविण्याची गरज आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील उच्च किमतींचा लाभ या क्षेत्राला मिळू शकेल. ते म्हणाले की, निर्यात कोट वाढविण्याबाबत लवकरच निर्णय घेतल्यास भारतीय साखर उत्पादकांना वेळेवर करार करणे, सध्याच्या उच्च आंतरराष्ट्रीय किमतींचा लाभ उठवण्यास मदत मिळेल. एप्रिलनंतर साखरेच्या किमती घसरण्याची शक्यता आहे. आणि ब्राझीलची साखरही आंतरराष्ट्रीय बाजारात दाखल होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here