चंदीगढ : बिकेयूचे वरिष्ठ नेते गुरनाम सिंह चारुनी यांनी २९ जानेवारी रोजी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या प्रस्तावित रॅलीत सहभागी होण्याचा आणि केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात घोषणाबाजी करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा दिल्यानंतर दोन दिवसानंतर, हरियाणातील मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी बुधवारी उसाच्या दरात वाढीची घोषणा केली. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी उसाचे राज्य सल्लागार मूल्य (एसएपी) सध्याच्या ३६२ रुपये प्रती क्विंटलहून वाढवून ३७२ रुपये करण्याची घोषणा केली. हरियाणातील शेतकऱ्यांनी ऊसाचा दर ३६२ रुपयांवरुन वाढवून ४५० रुपये प्रती क्विंटल करण्याची मागणी केली होती. चारुनी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी २० जानेवारीपासून हरियाणातील सर्व १४ साखर कारखान्यांचा ऊस पुरवठा बंद पाडला होता. ते साखर कारखान्यांसमोर आंदोलन करीत आहेत.
त्यांनी बुधवारी साखर कारखान्यांसमोर ट्रॅक्टरवरुन धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली होती. जेव्हा मुख्यमंत्र्यांनी चंदीगढमध्ये ऊसाच्या दरात वाढीची घोषणा केली, तेव्हा शेतकरी साखर कारखान्यांसमोर निदर्शने करण्याची तयारी करीत हते. चारुनी यांनी अशीही घोषणा केली होती की शेतकरी २७ जानेवारीपासून बेमुदत आंदोलन करण्यासाठी सर्व साखर कारखान्यांसमोरील रस्ते रोखून धरतील. शेतकरी नेते सर छोटू राम यांच्या जयंतीदिनी सांकेतिक विरोध करत शेतकरी ऊस जाळतील. अमित शहा यांच्या रॅलीबाबत भारीतय किसान युनियनचे (चारुनी) प्रमुख गुरनाम सिंह चारुनी यांनी सोमवारी सांगितले होते की, आम्ही अमति शहा यांच्या रॅलीमध्ये भाजपचे टी शर्ट घालून, भाजपच्या वाहनांमधून प्रवेश करू. एकदा ते बोलण्यास सुरुवात करतील, तेव्हा आम्ही आंदोलन करण्यासाठी आपला शर्ट उतरवतील.