पावसाने ऊस तोडणीत अडथळे, नो-केनमुळे बिसलपूर आणि पूरनपूर साखर कारखाना बंद

पुरनपूर : पावसामुळे ऊस तोडणीत व्यत्यय निर्माण झाला असल्याने पुरनपूर आणि बिसलपूर साखर कारखाना बुधवारी सकाळी आठ वाजता ऊस उपलब्ध नसल्याने बंद झाला. पुरेसा ऊस उपलब्ध झाल्यानंतरच कारखाना सुरू केला जाईल, असे व्यवस्थापनाने सांगितले. सोमवारी रात्रीपासून पुरनपूर विभागात सुरू झालेल्या पावसाने शेतकरी ऊस तोडणी करू शकले नाहीत. काही खरेदी केंद्रांवर पाणी साठले. त्यामुळे ऊस कारखान्यांपर्यंत पोहोचू शकला नाही. ऊस नसल्याने (नो केन) बुधवारी सकाळी आठ वाजता कारखाना बंद झाला. त्यामुळे ऊस खरेदी व वजन करण्याची प्रक्रियाही थांबविण्यात आली.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, यामुळे ऊस घेवून आलेल्या शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या. भाकियू (अराजकीय)चे जिल्हाध्यक्ष मंजित सिंह यांनी इतर शेतकऱ्यांना वेळेवर तोडणी पावती दिली न गेल्याने ऊस टंचाई झाल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, शेतकरी तोडणी पावत्यांसाठी हेलपाटे मारत आहेत. हजारो शेतकऱ्यांना एकही तोडणी पावती मिळालेली नाही. कारखान्याचे अधिकारी ऊस पोहोचला नसल्याने नो – केन स्थितीत कारखाना बंद पडल्याचा दावा करीत असले तरी हे खरे नाही, असा आरोप त्यांनी केला. साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक रमाकांत वर्मा यांनी सांगितले की, पावसामुळे पुरेसा ऊस उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे तोडणी थांबली आहे. बिसलपूरमध्येही अशीच स्थिती आहे. कारखान्याचे मुख्य ऊस अधिकारी अवधेश कुमार यांनी सांगितले की, बुधवारी मोठ्या प्रमाणात इंडेंट जारी केला आहे. मात्र, ऊस तोडणीत अडथळे निर्माण झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here