साखर कारखान्यांनी उसाच्या रसापासून थेट इथेनॉल उत्पादन करावे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

सांगली : केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सहकारी तसेच खासगी साखर कारखान्यांना उसाच्या रसापासून थेट इथेनॉल उत्पादनासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. सांगली जिल्ह्यातील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन समारंभात गडकरी बोलत होते. ते म्हणाले की, उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांसह साखर कारखानदार, खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांनी पुढे आले पाहिजे.

गडकरी यांनी सांगितले की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक पिक तोडणी योजना सुरू केली आहे, त्याचा वापर उसाची रिकव्हरी वाढविण्यासाठी केला जाईल. ते पुढे म्हणाले की, इथेनॉलसोबत भविष्यात हायड्रोजनही इंधनाच्या रुपात वापर केला जाईल. आणि शेतकऱ्यांनी त्याच्या उत्पादनासाठी पुढे आले पाहिजे. भविष्यात पश्चिम महाराष्ट्र हायड्रोजन उत्पादनाचे केंद्र बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार संजय पाटील आणि धैर्यशील माने, आमदार गोपीचंद पडळकर, जयंत पाटिल, सुधीर गाडगीळ, विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी आणि इतर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here