हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
सूरत (गुजरात) : चीनी मंडी
सातत्यानं होत असलेलं अतिरिक्त साखर उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेले साखरेचे दर यांमुळे भारतातील साखर उद्योग अडचणीत आला आहे. परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही या संकटाचा सामना करावा लागत आहे. दक्षिण गुजरातमधील ऊस उत्पादक शेतकरी यातून सुटलेला नाही. तेथील ऊस उत्पादक सलग दुसऱ्या वर्षी बिकट परिस्थितीचा सामना करत आहे आणि बहुदा या शेतकऱ्यांसाठी पुढचा हंगामही तसाच राहण्याची शक्यता आहे. दक्षिण गुजरातचा विचार केला तर, आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापूर्वी जवळपास सर्वच साखर कारखान्यांनी ऊस बिले भागवली आहेत. गेल्या हंगामात २४०० ते ३१०० रुपये दर देण्यात आला होता. यंदा २३०० ते ३ हजार असा दर देण्यात आला आहे.
या संदर्भात मोदी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समीर भक्त म्हणाले, गेली सलग दोन वर्षे अतिरिक्त उत्पादन झाले. आपली वार्षिक गरज २५० लाख टनाच्या आसपास असताना ३२० लाख टन साखर उत्पादन झाले या वर्षीही साखर उत्पादन ३२५ लाख टनाच्या पलिकडे जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीचा ७५ लाख टन साखर साठा आपल्याकडे असताना त्यात आता भर पडणार आहे. त्यामुळे साखरेचे दर खालीच राहणार आहेत हे स्पष्ट आहे.’
केंद्राने साखरेचा किमान विक्री दर २९ रुपयांवरून ३१ रुपये प्रति किलो केला आहे. साखरेच्या एकूण परिस्थितीबाबत गुजरात शेतकरी समाजाचे नेते जयेश पटेल म्हणाले, ‘एका बाजूला आपल्याकडे साखरेचे अतिरिक्त उत्पादन आहे तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचा दर २१०० ते २२०० रुपये क्विंटल आहे. डब्ल्यूटीओ ओग्री कमोडिटी ओपन जनरल लायसन्स (ओजीएल) अंतर्गत विदेशी विक्रेते भारतात त्यांचे उत्पादन २६०० ते २७०० रुपये दराने विकतात. त्यात वाहतूक खर्च जोडला तर, स्थानिक शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही लागत नाही.’ सरकारने तातडीने काही तरी उपाययोजना करायला हव्यात, असे मत पटेल यांनी व्यक्त केले.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp