खुशखबर ! देशात तांदळाच्या किमतही कमी होणार, केंद्र सरकारचे निर्देश जारी

नवी दिल्ली : देशात गहू आणि आट्याच्या किमतीवर सातत्याने चर्चा सुरू आहे. केंद्र सरकार गव्हाच्या किमतीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सातत्याने पावले उचलत आहे. सरकारने गव्हाच्या किमती आटोक्यात ठेवण्यासाठी त्याच्या निर्यातीवरही निर्बंध लागू केले आहेत. लवकरच गहू आणि आट्याच्या किमती कमी होतील असे संकेत आहेत. दरम्यान, आगामी काही दिवसांत तांदळाचे दरही कमी होऊ शकतात. याबाबत केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना निर्देश जारी केले आहेत.

एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारने तांदूळ खरेदीसाठी नवी गाईडलाईन जारी केली आहे. सर्व राज्यांसाठी लागू असलेल्या या गाईडलाईन्सनुसार राज्य सरकारांनी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून ३४०० रुपये प्रती क्विंटल दराने तांदूळ खरेदी करावा. राज्यांना हा तांदूळ ३४ रुपये प्रती किलो दराने मिळेल. केंद्र सरकारने सांगितले की, राज्यांमध्ये गरीबांच्या विकासासाठी अनेक योजना सुरू आहेत. त्या योजनांच्या अंमलबजावणीसाठीही एफसीआयकडून तांदूळ खरेदी केला जाऊ शकतो. तांदळाचे प्रकारनिहाय दर निश्चित करण्यात आले आहेत. दरम्यान, कोणत्या राज्याला किती तांदूळ द्यायचा याचा पूर्ण अधिकार एफसीआयकडे आहे. केंद्र आणि राज्य सरकार पारदर्शकतेसाठी नेहमी ई लिलावाचा वापर करते. मात्र, यावेळी भात खरेदीसाठी टेंडर अथवा लिलावाची गरज नाही असे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here