गहू, आट्याच्या किमती होणार कमी, आज खुल्या बाजारात येणार ३० लाख मे. टन गहू

नवी दिल्ली : गहू आणि त्यापासून निर्माण झालेल्या महागाईपासून सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळणार आहे. सरकारने देशातील किमती नियंत्रित करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी गव्हाचा पहिला ई – लिलाव आज, १ फेब्रुवारी २०२३ रोजी होईल. यासाठी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) खुल्या बाजारात गव्हाचा लिलाव करेल. एफसीआय आपल्याकडील साठ्यामधील ३० लाख मेट्रिक टन गहू विक्री करणार आहे.

झी बिझनेसने दिलेल्या वृत्तानुसार, गव्हाचा पहिला ई लिलाव आज, एक फेब्रुवारी रोजी होईल. यामध्ये २५ लाख मेट्रिक टनाचा समावेश असेल. यासाठी राखीव किंमत २३५० रुपये प्रती क्विंटल आणि भाडे याचा समावेश आहे. २ लाख मेट्रिक टन गहू राज्यांना दिला जाईल. तर ३ लाख मेट्रिक टन गहू केंद्रीय साठा, नाफेड, पीएसयूस आदींसाठी जारी केला जाणार आहे. जर गहू ई लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर दर बुधवारी ही प्रक्रिया राबवली जाईल. एफसीआयकडे देशभरात ५०० डेपोंसह २००० साठवणूक केंद्रे आहेत. पायाभूत सुविधांमध्ये एफसीआयने आपली साठवण क्षमता १९६५ च्या ६ लाख मेट्रिक टनापासून आज ८०० लाख मेट्रिक टनापर्यंत वाढवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here