लखनौ : राज्य सरकार कृषी अवशेषांपासून इथेनॉल आणि मिथेनॉल उत्पादनाच्या नव्या तंत्राचा स्वीकार करण्यासाठी मदतीबाबत डेन्मार्कशी चर्चा करीत आहे. डेन्मार्कचे राजदूत फ्रेडी स्वान यांनी अलिकडेच मुख्य सचिव डी. एस. मिश्रा यांची भेट घेतली आणि पाचट बायो स्ट्रॉ ब्रिकेटद्वारे इथेनॉल अथवा मिथेनॉलमध्ये रुपांतरीत करण्याच्या तंत्राबाबत चर्चा केली. २०२५ पर्यंत डेन्मार्क स्वतःचा पहिला प्लांट स्थापन केल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारला पुढील प्लांट युपीत स्थापन करण्यास मदत करेल अशी शक्यता आहे.
डेन्मार्कच्या राजदूतांनी मुख्य सचिव डी. एस. मिश्रा यांना सांगितले की, कृषी अवशेष, गहू तसेच भाताचा पाला यापासून बायो मिथेनॉल आणि इ मिथेनॉल उत्पादन केले जात आहे. किण्वन प्रक्रियेच्या माध्यमातून उत्पादित हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साइडपासून ई-मिथेनॉलचे उत्पादन होते.
डेन्मार्क या पेटंटच्या आधारावर पहिला प्लांट स्थापन करीत आहे आणि २०२५ मध्ये यामधून उत्पादन सुरू होईल. ४५० टन क्षमतेच्या सहा ब्रिकेट उत्पादन यंत्रांच्या माध्यमातून १४५ मिलियन सामान्य घनमीटर बायोगॅसपासून १ लाख टन इथेनॉल उत्पादन करण्याचा प्रस्ताव आहे.
हा प्लांट स्थापन करण्यासाठी २,२२५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.