रुडकी : हरिद्वारमधील तीन साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आता निम्म्यावर आला आहे. मात्र, राज्य सरकारने अद्याप ऊसाचा दर निश्चित केलेला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. याबाबत भारतीय किसान संघाशी संलग्न शेतकऱ्यांनी लक्सर येथील शेखपुरीत बैठक घेऊन सरकारने ऊस दर जाहीर न केल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सरकारने ऊस दर जाहीर करण्यास चालढकल केल्याबद्दल शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. याबाबत १० फेब्रुवारीपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन केले जाईल, असे शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे. आगामी काळात या प्रश्नाबाबत आंदोलनाचा इशारा किसान संघाने दिला आहे. बैठकीला कुशल पाल सिंह, राजपाल सिंह, राजकुमार, सुरेश कुमार, राज सिंह, गोरख सिंह, महेंद्र पाल, सुरेंद्र कुमार, अनवर सिंह आदी उपस्थित होते.