बांगलादेशच्या साखर उद्योगात गुंतवणुकीसाठी जपान इच्छुक

ढाका : जपान बांगलादेशमधील अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. यामध्ये साखर उद्योग, बायोमास, वीज उत्पादन आणि प्रिपेड गॅस मिटर उद्योगाचा समावेश आहे. जपान बँक फॉर इंटरनॅशनल को-ऑपरेशनचे (जेबीआयसी) गव्हर्नर नोबीमित्सु हयाशी यांनी पंतप्रधान शेख हसीना यांची ढाक्यात भेट घेतली. यावेळी त्यांनी आपण यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले. बैठकीनंतर मोहम्मद नजरुल इस्लाम यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

हयाशी यांनी सांगितले की जेबीआयसी बांगलादेशमध्ये साखर उद्योगासह बायोमास वीज उत्पादन, प्रीपेड गॅस मीटर उद्योग या विशेष क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जपानमधील उद्योगांना कर्ज प्रदान करण्यासाठी इच्छुक आहे. पंतप्रधान हसीना यांनी या प्रस्तावांचे कौतुक करताना सांगितले की, देशातील १५ साखर कारखान्यांपैकी एक अथवा दोन कारखाने जपानी गुंतवणुकदारांना उपलब्ध करुन दिले जाऊ शकतात. जपान आणि बांगलादेशमधील द्विपक्षीय संबंध भविष्यात आणखी मजबूत होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here