नवी दिल्ली : युरोपीय संघ आणि भारतातील कमी उत्पादनाच्या अंदाजामुळे जागतिक स्तरावर कच्च्या साखरेच्या किमती नजीकच्या कालावधीत १९-२२ अमेरिकन सेंट प्रती पाऊंड (₹३३,०७५-४०,४७५ प्रती टन) राहतील अशी शक्यता आहे. अभ्यासकांच्या अनुमानानुसार, ब्राझील आणि थायलंडमधील जादा उत्पादनानंतरही ही स्थिती कायम राहील. त्यांच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबरपासून झालू झालेल्या हंगामात भारताकडून ३१ मे अखेर सहा मिलियन टनाशिवाय अतिरिक्त साखर निर्यातीस परवानगी दिली जाण्याची शक्यता नाही. सद्यस्थितीत इंटर कॉन्टिनेन्टल एक्सचेंज न्युयॉर्कमध्ये मार्चच्या वायद्यासाठी कच्च्या साखरेच्या किमती २१.३० सेंट (₹३९,०७५ प्रती टन) वर करारासह ५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
मात्र, या हंगामात ब्राझीलमध्ये उत्पादन ७.६ टक्के वाढून ३८.१ मिलियन टन होण्याचे अनुमान आहे. आणि अमेरिकेच्या विदेश विभागाने ब्राझीलच्या निर्यातीत ८.७ टक्के वाढीची शक्यता वर्तवली आहे. लंडनस्थिर डायव्हर्सिफाइड ग्लोबल फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्म मारेक्सने आपल्या साप्ताहिक साखरेच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, साखरेचा साठा कमी आहे आणि नवीन पिकाचा पुरवठा निराशाजनक ठरू शकतो.
फिच सोल्यूशन्सने म्हटले आहे की, फ्रान्समध्ये साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. कारण अलिकडेच किटकनाशकाचा वापर करण्याच्या परवानगी देण्याच्या निर्णयापासून माघार घेण्याच्या सरकारच्या भूमिकेने पिकाबाबतची चिंता वाढली आहे. त्याला नियोनिकोटिनोइड्सच्या रूपात ओळखले जाते. फ्रान्सच्या उत्पादनांवर नियोनिकोटिनोइड्समधील घसरणीचा प्रभाव स्पष्ट नाही. मात्र, उद्योगाच्या प्रतिनिधींकडून पिकावर व्हायरसचा परिणाम होवून पिक धोक्यात येऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे. फिच सोल्यूशन्सने भारताचे साखर उत्पादन ३५.८ मिलियन टन होईल अशी शक्यता वर्तविताना भारत सरकार अतिरिक्त साखर निर्यातीस परवानगी देणार नाही अशी शक्यता वर्तवली आहे.