मुझफ्फरनगर : तब्बल २० फूट उंचीचा ऊस उत्पादन करून आसिफचा विक्रम

मुझफ्फरनगर : मेरठ-कर्नाल महामार्गावरील सराईजवळील जौला गावातील १८ वर्षीय ऊस उत्पादक शेतकरी आसिफ यांनी शेतात घेतलेल्या कष्टाचे चीज होताना दिसत आहे. रस्त्याने जाताना शेतात दिसणारा सुमारे २० फूट उंच ऊस पाहण्यासाठी शेतीची आवड असलेले अनेक लोक येथे थांबतात. एक एकर क्षेत्रात सुमारे १२० क्विंटल उसाचे विक्रमी उत्पादन पाहुन लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकरी फरमान यांचा मोठा मुलगा असिफ याने वयाच्या १८ व्या वर्षी सेंद्रिय शेतीत प्रभुत्व मिळवून नाव कमावले आहे. ते ३० एकर शेती करत असल्याचे सांगतात. सध्या त्यांच्या शेतात ऊसाचे ०२३९ वाण आहे. बजाज शुगर मिल भैसाना यांनी या जातीचे वाण उपलब्ध करून दिले होते. गेल्या चार वर्षांपासून शेती करणाऱ्या आसिफ यांनी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला आहे. शेणखत वापरले. सध्या पिकाची उंची २० फूटापर्यंत पोचली आहे. ही अनोखी शेती पाहण्यासाठी अनेक लोक दररोज भेट देत आहेत. आसिफ यांच्या म्हणण्यानुसार शेतीत केलेल्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळते. ते यावेळी १५०२३, १४२०१, ०११८ आणि १३२३५ या वाणांच्या पेरणीची तयारी करत आहेत. भैसाना साखर कारखान्यातर्फे उत्तम ऊस उत्पादनासाठी आसिफ यांना ३१ हजार रुपयांचे बक्षीस दिले गेले आहे. त्यातून त्यांना प्रोत्साहन मिळाल्याने त्यांना शेतीची आवड अजून जास्त निर्माण झाली. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करावा असे आसिफ सांगतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here