मेरठ : राष्ट्रीय लोकदलाचे नेते रणबीर दहिया यांच्या निवासस्थानी मंगळवारी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या वर्षातील थकीत ऊस बिले आणि या वर्षी ऊस दर जाहीर करण्यात आला नसल्याबद्दल रोष व्यक्त केला.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या बैठकीस उपस्थित शेतकऱ्यांनी यंदा उसाला ४५० रुपये प्रती क्विंटल दर जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांनी गेल्या हंगामातील थकीत बिले न मिळाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. यावेळी योगेंद्र सिंह पतला, सत्येंद्र तोमर, गजेंद्र पाल सिंह, करण सिंह, देवेंद्र सिंह, राम भरोसे लाल, मोरिया, जयवीर सिंह, गौरव, अनिल कुमार पतला, नरेंद्र नंद्रे आदी उपस्थित होते.