नवी दिल्ली : इंधन कंपन्यांना आज सरकारने मोठा दिलासा दिला आहे. देशात उत्पादित कच्चे तेल, डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यातीवर विंडफॉल प्रॉफिट टॅक्समध्ये कपात करण्यात आली आहे. नवे दर आज, १६ फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या एका आदेशानुसार, आता ऑईल अँड नॅच्युरल्स गॅस कॉरपोरेशनसारख्या कंपन्या जे कच्चे तेल काढतील, त्याव ५०५० रुपये प्रती टन ऐवजी ४३५० रुपये प्रती टन लेवी द्यावी लागेल. याला जवळपास दोन आठवडे आढावा घेतला जातो. त्यानंतर जागतिक स्तरावरील दरांनुसार आकारणी केली जाते.
मनीकंट्रोलमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कच्च्या तेलावर आता लेवी ५०५० रुपये प्रती टनाऐवजी ४५५० रुपये प्रती टन करण्यात आली आहे. याशिवाय डिझेलच्या निर्यातीवरील टॅक्स ७.५ रुपये प्रती लिटरवरुन २.५० रुपये आणि एटीएफ निर्यातीवरील कर ६ रुपयांवरुन घटवून १.५० रुपये करण्यात आला आहे. याशिवाय पेट्रोलवरील अतिरिक्त एक्साइज ड्यूटीही शून्य टक्के केली आहे. जमिनीखालील कच्चे तेल काढून त्यावर प्रक्रिया करुन पेट्रोल, डिझेल, एटीएफमध्ये त्याचे रुपांतर केले जाते. १ जुलै २०२२ रोजी पहिल्यांदा विंडफॉल गेन टॅक्स लागू करण्यात आला होता. त्यानंतर भारत अशा देशांमध्ये सहभागी झाला, जे देश कंपन्यांच्या सुपर नॉर्मल प्रॉफिट नुसार अतिरिक्त कर आकारतात.