उसाच्या कॅन्सरवरील औषधाची मागणी वाढली

बिजनौर : उसाचा कॅन्सर म्हटल्या जाणाऱ्या लाल सड रोगावर ट्रायकोडर्मा औषधाचा चांगला परिणाम दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे औषध मिळविण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. कारखानेही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना औषध मिळावे यासाठी निम्म्या किमतीवर ते उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, धामपूर साखर कारखान्याचे यावर्षी ५२ हजार हेक्टर ऊसाचे क्षेत्र आहे. कारखान्याचे महाव्यवस्थापक ओमवीर सिंह यांनी सांगितले की, ऊस पिकावर लाल सड रोग पसरला आहे. त्याला उसाचा कॅन्सरही म्हटले जाते. या रोगामुळे किमान १० टक्के ऊस वाळतो असे त्यांचे म्हणणे आहे. ओमवारी सिंह यांनी सांगितले की, कृषी संशोधकांच्या सल्ल्यानुसार गेल्यावर्षी १५ हजार किलो ट्रायकोडर्मा औषध शेतकऱ्यांना वितरण केले गेले. यावर्षी औषधाचे वितरण सुरू आहे. दरवर्षी ऊस लागण सुरू झाली की ४० हजार किलो औषधाची विक्री झाली आहे. कारखान्याने हे औषध ९० रुपये प्रती किलोने विक्री केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here