बस्ती : उद्योग क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल बलरामपूर शुगर मिल्स ग्रुपला उत्तर प्रदेश सरकारच्यावतीने लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते शुक्रवारी लखनौमध्ये आयोजित एका कार्यक्रमात हा पुरस्कार बलरामपूर शुगर मिल लिमिटेड ग्रुपचे संस्थापक, पद्मश्री दिवंगत मिनाक्षी सरावगी यांच्यावतीने त्यांची कन्या तथा ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालक अवंतिका सरावगी यांनी स्वीकारला.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखान्याचे मुख्य महाव्यवस्थापक अजय दुबे यांनी सांगितले की, बलरामपूर ग्रुपचे दहा साखर कारखाने राज्यात कार्यरत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक रोजगार आणि सर्वात आधी शेतकऱ्यांना ऊस बिले देण्यामध्ये ग्रुप आघाडीवर आहे. यासोबतच हरित ऊर्जा, इथेनॉल उत्पादनात समूह देशात पहिल्या क्रमांकावर आहे. दरम्यान, पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रुपशी संलग्न अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.