महाराष्ट्रात १६१ साखर कारखान्यांनी थकवले शेतकऱ्यांचे पैसे

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

पुणे : चीनी मंडी

साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना राज्यातील अवघ्या ३४ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाचा रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) दिला आहे. तब्बल १६१ साखर  कारखान्यांनी शेतकऱ्यांचे मार्च अखेरपर्यंतचे सुमारे ४८३१ कोटी १८ लाख रुपये थकवले आहेत. यापैकी वारंवार नोटिसा बजावूनही एफआरपी न देणाऱ्या साखर कारखान्यांवर आयुक्तालयाने रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेटची (आरआरसी) कारवाई केली जाणार आहे. अशा कारखान्यांची संख्या ४९ आहे.

राज्यातील १९५ साखर कारखाने यंदाच्या हंगामात कार्यरत होते. यापैकी १३८ कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. मार्च अखेरपर्यंत या कारखान्यांनी ९३९ लाख टन उसाचे गाळप  केले आहे. आतापर्यंत एकूण १०५ लाख टन साखर उत्पादित केली आहे. शेतकऱ्यांच्या एफआरपीचा आढावा घेता १५ मार्चअखेर गाळप झालेल्या ९०५ लाख टन उसापोटी २१ लाख १५४ कोटी रुपये शेतकऱ्यांना देय आहेत. यापैकी १६ हजार ५४४ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत. अद्याप ४८०० कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे.

साखरेची उचल आणि विक्री यातील तफावत पाहता अवघ्या ३४ कारखान्यांनाच एफआरपीची पूर्ण रक्कम देणे शक्य झाले आहे. तर ५७ कारखान्यांनी ८० ते ९९ टक्क्यांपर्यंत एफआरपी दिली आहे. आणखी ५३ कारखान्यांनी शेतकऱ्यांना ६० ते ७९ टक्के एफआरपीचे पैसे दिले आहेत. तर १२ कारखान्यांनी चाळीस टक्क्यांच्या आतच एफआरपी दिली आहे. राज्यातील पाच कारखाने तर असेही आहेत की, ज्यांनी शेतकऱ्यांना एक रुपयाही अद्याप दिलेले नाहीत. दरम्यान, शेतकऱ्यांना गेल्या हंगामातील सुमारे अडीचशे कोटी रुपये मिळणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे साखर आयुक्तालयाने आरआरसीअंतर्गत कारवाई सुरू केली आहे.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here