मोलॅसीसच्या आयातीस परवानगी देण्याची फिलिपाइन्स सरकारकडे मागणी

मनीला : बायो इथेनॉलच्या उत्पादनासाठी आणि इथेनॉल उत्पादकांचा खर्च कमी करण्यासाठी, इथेनॉल उद्योगाने सरकारकडे मोलॅसिसच्या नियमित आयातीस परवानगी देण्याचा आग्रह केला आहे. इथेनॉल प्रोड्यूसर्स असोसिएशनचे (ईपीएपी) अध्यक्ष गेरार्डो टी यांनी सांगितले की, उद्योगाला बायो इथेनॉलचे उत्पादन करण्यासाठी ५,००,००० मेट्रिक टन (एमटी) मोलॅसिसच्या तुटवड्याचा सामना करावा लागतो. ते म्हणाले की, आम्ही सरकारकडे नियमित दरात कच्च्या मालाची आयात करण्याची मागणी केली आहे. सरकार प्रक्रियाकृत केलेल्या तयार मालाची अनुमती देत आहे, मग उद्योगासाठी जर कच्चा माल कमी पडत असेल तर त्यास परवानगी का नाही. गेरार्डो टी म्हणाले की, देशात साखरेचा पुरवठा पुरेसा नाही. त्यामुळे मोलॅसीसचीही कमतरता आहे.

मोलॅसीसचा वापर डिस्टिलरींकडून अल्कोहोल आणि इथेनॉल उत्पादनासाठी केला जातो. इथेनॉल उद्योगाला आपल्या व्यवस्थापनास पुर्ण पाठबळ देण्यासाठी १.६ मिलियन एमटी मोलॅसीसची गरज आहे. मात्र, एसआरएन केवळ जास्तीत जास्त १.१ मिलियन मेट्रिक टन उपलब्ध होईल असे संकेत देत आहे. शुगर रेग्युलेटरी अॅडमिनीस्ट्रेशन (एसआरए) बोर्डाद्वारे अलिकडेच या वर्षी साखर पुरवठा वाढवणे आणि किमती स्थिर करण्याासाठी ४,४०,००० एमटी रिफाईंड साखरेच्या आयातीच्या योजनेस मंजुरी देण्यात आली आहे. एसआरएने या वर्षी कच्ची साखर उत्पादनाचे अनुमान घटवून १.८३१ मिलियन मेट्रिक टन केले आहे. यापूर्वी १.८७६ मिलियन मेट्रिक टन साखर उत्पादनाचे अनुमान व्यक्त केले होते. २००६ च्या जैव इंधन अधिनियमानुसार फिलिपाईन्समध्ये विक्री केल्या जाणाऱ्या मोटार, इंजिनसाठी सर्व प्रकारच्या इंधनात स्थानिक रुपात तयार केलेल्या जैव इंधनाचा, बायो इथेनॉल, बायोडिझेल आणि बायोमास यापासून तयार केलेल्या इंधनाचा समावेश असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here