ब्राझीलमध्ये पूर आणि भूस्खलनाने विद्ध्वंस, आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू

ब्राझीलमध्ये सातत्याने सुरू असलेल्या पावसाने मोठे संकट कोसळले आहे. ब्राझीलमधील फोल्हा डी एस पाउलो या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, साओ पाउलो शहरात अटलांटिक किनाऱ्यावर भूस्खलन आणि पुरामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ३६ वर पोहोचली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. साओ सेबस्टियाओने रविवारी सार्वजनिक आपत्कालिन परिस्थितीची घोषणा केली आहे. शहरात दोनशेहून अधिक लोकांचे विस्थापन झाले असून ३०० लोक बेघर झाले आहेत. रस्ते बंद पडले आहेत.

जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, साओ सेबस्टियाओला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यांचा शेजारील राज्यांशी संपर्क सुटला आहे. आणखी अनेक जणांचा मृत्यू झालेला असू शकतो अशी भीती व्यक्त होत आहे. देशाच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात कमी कालावधीत या तीव्र वादळाची नोंद झाली असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, गेल्या २४ तासात काही ठिकाणी ६०० मिलिमिटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पुरामुळे देशातील परिस्थिती बिकट झाली असल्याचे सांगण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here