पाकिस्तानमध्ये परिस्थिती बिकट, अनेक श्रीमंतांनी देश सोडला, कंपन्यांना बंद

पाकिस्तानमधील स्थिती सुधारत नसल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस लोकांसमोरील अडचणी वाढत आहेत. महागाईने हाहाकार उडाला असल्याने लोकांच्या जेवणातून भात, भाकरीही गायब झाली आहे. त्यावर आता बेरोजगारीचे संकट आहे. संकटग्रस्त पाकिस्तानमधील कच्चा माल पुरवठा अडचणीत आल्याने सुझुकी मोटर्ससह अनेक बड्या कंपन्यांना आपल्या प्रकल्पांना टाळे ठोकले आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक बड्या कंपन्यांनी येथून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे महागाईने त्रस्त लोकांसमोर बेरोजगारीचे संकट आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार सुझुकी मोटर्स कॉर्पोरेशन, जीएसके, डायमंड इंडस्ट्रीज लिमिटेड, मिल्लात ट्रॅक्टर्स लिमिटेड आदींनी आपले प्लांट बंद केले आहेत.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, कंपन्यांना कच्चा माल मिळत नसल्याची स्थिती आहे. सुझुकी मोटर्सचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट २ फेब्रुवारी रोजी बंद पडला. टायर, ट्यूब, औषधे अशा अनेक घटकांशी संबंधीत कंपन्यांनी कामकाज थांबवले आहे. औषध कंपन्या बंद झाल्याने लोकांमध्ये औषधोपचाराविषयी अडचणीची स्थिती निर्माण होऊ शकते. पाकिस्तानचा परकीय चलन साठा जवळपास संपत आला आहे. तो गेल्या आठवड्यात ३ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचल्याचे आणि देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आल्याची कबुली देशाचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली होती. त्यांनी राजकीय नेते, सैन्यदल आणि नोकरशाहीवर टीका केली होती. देशात महागाई तीस टक्क्यांवर पोहोचल्याचे उघड झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here