आंध्र प्रदेश: ऊसाच्या शेतीबाबत शेतकरी नाखूश

श्रीकाकुलम : आंध्र प्रदेशच्या उत्तर विभागातील जिल्हे, श्रीकाकुलम, विजयनगरम आणि पार्वतीपुरम (मण्यम) मधील शेतकरी ऊस शेतीबाबत हवालदिल झाले आहेत. पिकाची लागवड, तोडणी आणि वाहतुकीच्या खर्चात वाढ हे शेतकऱ्यांच्या निराशेचे मुख्य कारण आहे. ऊस पिकाच्या शेतीसाठी प्रती एकरी १५,००० रुपयांची गरज भासते. याशिवाय, उसाची तोडणी, ऊस साखर कारखान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकऱ्यांवर अतिरिक्त बोजा पडत आहे.

यापूर्वी उत्तरेकडील शेतकरी ऊस तोडणीच्या उद्देशाने पूर्व गोदावरी जिल्ह्यातील तुनी आणि आसपासच्या क्षेत्रातील कामगारांना कामावर आणत होते. मात्र, आता तुनी विभागात कुशल कामगारांची कमतरता आहे. आणि शेतकरी या समस्येची सोडवणूक करण्यासाठी स्थानिक कामगारांवर अवलंबून आहेत. ऊस तोडणीसाठीची मजुरी वाढून २२,००० रुपये प्रती एकर करण्यात आली आहे. ऊस पिक शेतामधून साखर कारखान्यापर्यंत पोहोचविण्याचा खर्चही शेतकऱ्यांवर ओझे बनला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.

ऊसाचे प्रती एकर सरासरी उत्पादन २५ टन होते. साखर कारखान्यापर्यंत ऊस पोहोचविण्यासाठी एकूण ४४,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागते. सरकारकडून ऊसाचा जाहीर झालेला दर २९८० रुपये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ऊस पिक तोट्याचे ठरत आहे. जर परिस्थिती अनुकूल असली तर एक एकरमधून शेतकरी ऊस पिकाच्या शेतीमधून ५९,६०० रुपये कमवतो. यापैकी एकूण ४४००० रुपये खर्च वजा केल्यावर शेतकऱ्याला १५,६०० रुपये प्रती एकर नफा मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here